रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी
जिल्हा संपादक चंद्रपूर
गणेश उराडे ८९२८८६००५८
वरोरा:- तालुक्यातील वाठोडा या गावातील युवक शेतकरी सचिन शेषरावं वाकेकर वय २५ वर्ष दुपारी २ च्या सुमारास आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता रानडुकराणे त्याच्या वर हल्ला केला त्यात युवक शेतकरी हा गंभीर जखमी झाला. जखमी शेतकऱ्याला वरोरा वरून चंद्रपूर ला रेफर केले आहे. तर कोसरसार येथील युवक आदेश हरिहर तडस वय २६ या युवकाला रानडुकराने गभीर जखमी केले या शेतकऱ्याला कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक इलाज करून ग्रामीण रुग्णालय वरोरा येथे रेफर केले आहे. पुढील तपास वनविभागाचे चांभारे साहेब यांच्या मार्गदर्शनात वाटेकर साहेब करत आहे