खाजगी फायनान्समुळे अंत्री खेडेकर येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या .
मयुर मोरे चिखली
चिखली : - तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील प्रवीण अशोक जाधव वय ३५ या तरुण शेतमजुराने खासगी फायनान्सच्या कर्जापायी रात्रीला दहा वाजेच्या दरम्यान स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री घडली .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले प्रवीण जाधव यांनी खासगी तीन फायनान्सचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये पी केअर ५० हजार रुपये, भारत फायनान्स ५० हजार रुपये, व एक स्वतंत्र बँक ५० हजार रुपये, असे एकूण एकूण दिड लाख रुपये कर्ज त्याच्यावर होते. यावर्षी पडलेला ओला दुष्काळ व पिकांवर झालेला
रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतमजुरांना खेड्यापाड्यांत कामे मिळत नाहीत. तसेच कोरोनामुळे गेली तीन वर्षे ग्रामीण भागात काही रोजगारही नसल्याने प्रवीण जाधव हा हे पैसे व त्याचे हप्ते वेळेवर फेडू शकला नाही. त्यामुळे या खासगी फायनान्सवाल्यांनी त्याच्यावर पैसे भरण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला होता. तसेचबत्याला वैयक्तिकरित्या धमक्याही दिल्या जात होत्या, अशी चर्चा गावात होत आहे. त्यामुळे प्रचंड नैराश्यात गेलेल्या प्रवीणने काल रात्री घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.मात्र घरातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नी व दोन मुलांवरील वडिलांचे छत्र हरविल्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत .या घटनेची माहिती उपसरपंच भास्कर मोरे तथा पोलीस पाटील रामदास मोरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार पोफळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा करुण कलम १७४ नुसार मर्ग दाखल केला आहे .