दिव्यांग निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ आर्थिक मदत द्या- प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले

 दिव्यांग निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ आर्थिक मदत द्या- प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले

(प्रतिनिधी live महाराष्ट्र न्यूज) -ब्रेक द चैन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यात कडक निर्बंध घातलेले असल्याने दिव्यांग, निराधार व नोंदणीकृत बांधकाम कामगार व नोंदणीकृत रिक्षाचालक  कोरोना काळात हवालदिल झाल्याने व तसेच कोरोना संकट काळात त्यांना कोणतेही काम मिळत नसल्याने दिव्यांगा सह इतर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दिव्यांग,निराधार व कामगारांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची घोषणा लॉकडाऊन पूर्वी ठाकरे सरकारने केली आहे. त्या अंतर्गत दिव्यांग, निराधार वयोवृद्धांना प्रत्येकी व्यक्तीला एक हजार रुपये, तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व नोंदणीकृत रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. पण ती आर्थिक मदत लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करावी जेणेकरून लॉकडाउन संकट काळात दिव्यांग व कामगारांना आर्थिक मदतीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी. जेणेकरून दिव्यांग व्यक्ती व कामगारांना काही प्रमाणात का होईना कोरोना संकट काळात जीवन जगण्या थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांना आर्थिक मदत होईल, असे मत *प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले* यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler