मराठा आरक्षण मोर्चात मुस्लिम समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावे

 मराठा आरक्षण मोर्चात मुस्लिम समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावे

-----------------------------------------------

जहीर खान शिवसंग्राम तालुका संघटक यांचे आवाहन

-----------------------------------------------

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

पाच जून २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हा अधिकारी कार्यालय बीड असा भव्य मराठा आरक्षणाचा मोर्चा निघणार आहे.या मोर्चाला मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे तालुका संघटक जहीर पठाण व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अजमत खान यांनी केले आहे.

       जहीर पठाण व अजमत खान यांनी संयुक्तरित्या काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हंटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला.विधानसभेत या प्रश्नाला खरी वाचा फोडली.ते बहुजनांचे नायक आमदार विनायकराव मेटे यांचे नेतृत्व या मोर्चाला लाभणार आहे.शिवाजी महाराजांच्या काळापासून मुस्लिम समाज हा मराठा समाजासोबत होता आणि आजही आहे.आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,तोपर्यन्त मुस्लिम समाज बांधव मराठा समाज बांधवा सोबत असणार आहे.ज्यांनी मुस्लिम आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविला अशा विनायकराव मेटे साहेबांचे नेतृत्व या मोर्चाला असल्यामुळे लाखोंच्या संख्येने हा मोर्चा होणार आहे.त्यामुळे बुलढाणा जिल्हातील मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येत या मोर्चात उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे तालुका संघटक जहीर पठाण व अल्प संख्याक तालुका अध्यक्ष अजमत खान यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler