मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅन्सर ने मृत पावलेल्या व्यक्तीच्या घरच्यांना शिवसेने तर्फे अकरा हजार रुपयांचा चेक देऊन सांत्वन
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
80% समाजकारण 20%राजकारण स्वर्गवासीयांच्या नेतृत्वात हिंदुहृदयसम्राट सन्मानीय बाळासाहेब ठाकरे यांनी
घालून दिलेल्या आदर्श ठेवत मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्ष प्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे वाढदिवसाचे ओचित्य साधून चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर तथा आदिवासी नेते रमेश मेश्राम भद्रावती तालुक्यातील विलोडा गावातील कॅन्सरनी मृत पावलेल्या येटे यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन करण्यात आले. व येडे कुटुंबाला अकरा हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी भविष्यात या कुटुंबाला वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. विलोडा येथील भारत येटे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे गाडा चालवायचे मात्र त्यांचा कॅन्सरणे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी श्रीमती इंदुताई येटे एक तीन वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी आहे.कर्ता पुरुष मरण पावल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आघात झाला आहे. जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या हस्ते इंदुताई येटे यांना अकरा हजार रुपयाची रोख मदत करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हा प्रमुख तथा आदिवासी नेते रमेश मेश्राम गावातील सिंगलदिप पेंदाम, संजय उईके,ग्रामपंचायत सदस्य विद्या किन्नाके,शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदू पढाल,तालुका संघटक नरेश काळे,शंकर धानकी, दिलीप झाडे, गावातील प्रतिष्ठान मान्यवर, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
