चिमूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल ला कंटाळून मोबाईल केले परत
तालुक्याच्या एकात्मीक प्रकल्प कार्यालयात मोबाईल वापसी आंदोलन झाले यशस्वी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे 7030115037
अंगणवाडी च्या कामात पारदर्शकता यावी म्हणून सरकारने अंगणवाडी कर्मचार्याना मोबाईल वितरण केले तेही मोबाईल निकृष्ट दर्जा चे असल्याने अनेक प्रकारच्या अडचणीना अंगणवाडी कर्मचारी यांना तोंड द्यावे लागत आहे याविषयी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र चे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी यापूर्वी अनेकदा सरकारला निवेदणे पाठवीली मात्र सर्व मुद्दे शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी कोनतीही कार्यवाही करन्यास असमर्थता दर्शवून अजुन पर्यत या संदर्भात सरकारने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आज १७ ऑगस्टला चिमूर तालुक्यातील एकात्मीक प्रकल्प कार्याल्यावर अंगणवाडी कर्मचारी मोबाईल वापसी आंदोलन करून तालुक्यातील एकात्मीक बालविकास प्रकल्प येथे मोबाईल जमा केले अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा जुना व नादुरस्तआहे मोबाईल दुरस्त केला तर चार ते पाच हजार खर्च येतो तो अंगणवाडी सेविकाकडून वसुल केला जातो शासनाने दिलेले जुने मोबाईल परत घेवून चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे वैयक्तीक किवा त्यांच्या सामाईक मोबाईलवर शासकीय काम करण्यास भाग पाडु नये शासनाने दिलेल्या मोबाईल मध्ये रॅम व रॉम कमी असल्यामुळे तो डाऊनलोड होत नाही इंग्रजी न येनाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यात त्रयस्ताच्या मदतीशिवाय माहीती भरणे शक्य होत नाही महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना इंग्रजीमध्ये माहीती भरण्याची जबरदस्ती करने योग्य नाही अंगणवाडी कर्मचार्याचे मुळ काम लाभार्थ्याना सेवा देने आहे त्याची पुर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ऍपमध्ये माहीती पाठवीन्यात अडचणीमुळे कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभाथ्याना देन्यात येणाऱ्या पोषण आहारात कपात करने अन्यायकारक आहे मोबाईलवर काम करनाऱ्या सेवीका मदतनीस यांना देन्यात येणारा अडीजशे व पाचशे प्रोत्साहन भत्ता मिळन्यामध्ये प्रचंड अनियमीतता आहे मोबाईल चे वाढलेले काम पाहता किमान हजार ते दोन हजार अशी भत्यात वाढ करावी अंगणवाडी सेविकाच्या रिक्त जागेवर ताबडतोब भरती करण्यात यावी आदी मागन्या घेवून अंगणवाडी कर्मचारी जिल्ह्यातील सर्व एकात्मीक बालविकास प्रकल्प येथे आज
१७ ऑगस्ट अंगणवाडी कर्मचारी मोर्चा बालविकास अधिकारी कार्यालय वर आंदोलन केले दरम्यान शासनाने दिलेला मोबाईल वापस करनार आहे प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र चे जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान कुरेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन केले आहे या प्रसंगी चिमूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका होते

