शहीद क्रांतीवीरांना अभिवादन करीत भाजपाची तिरंगा रॅली तालुक्यात दुमदुमली.

शहीद क्रांतीवीरांना अभिवादन करीत भाजपाची तिरंगा रॅली तालुक्यात दुमदुमली. 


खासदार अशोक नेते ,आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची उपस्थिती.


चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

सचिन वाघे मो.9673757006




         भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चिमूर येथील क्रांतीवीरांनी प्राणाची आहुती देत शहीद झाले. शहीद  क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी १६ आगस्ट शहीदस्मृती दिन दिवशी हुतात्मा स्मारक व अभ्यंकर मैदान येथे  खासदार अशोक नेते आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील १९४२  ची चिमूर क्रांती व क्रांतिवीर शहीदांचे त्याग व बलिदान अजरामर राहण्यासाठी तालुक्यात दुचाकी तिरंगा रॅली चे आयोजनाच्या माध्यमातून पुढील पिढीला चिमूर क्रांती स्मरणात राहण्यासाठी रॅली चे आयोजन होते.  

   तिरंगा रॅली एमआयडीसी मधून प्रारंभ होऊन मुख्य मार्गाने जाऊन भिसी कडे प्रयाण शंकरपूर जांभूळघाट नेरी चिमूर येथे समारोप करण्यात आले. तिरंगा दुचाकी रॅलीत तिरंगे झेंड्यासहित  शहीद  बालाजी रायपूरकर अमर रहे ,भारत माता की जय, वंदेमातरम ,चिमूर क्रांती जिल्हा झाला पाहिजे अश्या गगन भेदी घोषणा देत तिरंगा रॅली तालुक्यात दुमदुमली. दरम्यान जागोजागी फटाकेची आतिषबाजी करीत रॅली चे स्वागत करण्यात आले. 

या रॅलीत  खासदार अशोक नेते, आमदार बंटीभाऊ भांगडीया, भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर ,डॉ श्यामजी हटवादे, जीप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर ,भाजप जिल्हा सचिव राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, महिला तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, जीप सदस्य मनोज मामीडवार , युवा नेते समीर राचलवार ,भाजयूमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले पस सदस्य अझहर शेख, पुंडलिक मत्ते  प्रदीप कामडी  तर विवेक कापसे ,संजय खाटीक विनोद चोखरे, प्रफुल कोलते सचिन फरकाडे जयंत गौरकर आदी सहभागी होते.

तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी समीर राचलवार यांचे नेतृत्वात बंटी वनकर, अमित जुमडे, श्रेयस लाखे, नैनेश  पटेल, गोलू भरडकर, सचिन डाहुले, विकी कोरेकर, रोशन बनसोड, पिंटू खाटीक, अरबाज खान, पियुज जाधव, रोहित मडावी, गजू जांभूळे, करणं सरदार, करणं चावरे उत्कर्ष मोटघरे अनिकेत सातपुते दिनेश रामटेके प्रकाश असावा सुरज पचारे शुभम भोपे सावन गाडगे स्वप्नील शेंडे निखिल भुते आदी युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler