स्थानिक प्रशासन म्हणजे डोळे मिटून दुध पिणारे मांजर - प्रहार सेवक आशिष घुमे

स्थानिक प्रशासन म्हणजे डोळे मिटून दुध पिणारे मांजर - प्रहार सेवक आशिष घुमे

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा :- मांजर दुध पितांना डोळे मिटून दुध पिते .ते पित असताना तिला वाटते की कुणाला दिसत नाही पण हा त्या मांजरीचा भ्रम असतो . सर्व जग हे तिच्याकडे बघत असते . असाच काहीसा प्रकार वरोरा तालुक्यातील स्थानिक प्रशासनात सुरू आहे . चिरीमिरी घेवून नागरिकांच्या बाजूला उभे न राहता नेहमी कंपनी प्रशासनाच्या पाठी राहणारे सर्वोत्कृष्ट अधिकारी या वरोरा तालुक्याला लाभले ते येथिल जनतेचे अहोभाग्यच नाहीं का .

वरोरा तालुक्यात  युवकांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून मोहबाळा गावा लगत एम आय डी सी उभारल्या गेली . त्यात अनेक लघु उद्योग उभारल्या गेले . त्या सोबतच दोन मोठे वीज निर्मिती प्रकल्प उभे राहिले. आता येथिल बेरोजगारांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या .पण स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वरदहस्तामुळे त्या कंपनी व्यवस्थापनाचा हेकेखोरपणा वाढतच गेला आणि बेरोजगारांचे  स्वप्न स्वप्नच राहिले  बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली . या काळात अनेकांनी (राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी) कधी गावात मोठ मोठाले बॅनर लावून ऐन वेळेवर आंदोलनं मागे घेतले तर काहींनी आंदोलनाचा आव आणत आपले खिसे गरम केले . यात पिटला गेला तो बेरोजगार . निवडणूक आली की रोजगाराची आशा दाखवीत वेठबिगारा सारखे  मेहनत  या बेरोजगारांकडून  केल्या जाते .  निवडणूक संपली कि काम झालं माझं काय करु तुझं म्हणत . त्यांना वाऱ्यावर सोडल्या जाते . कुठल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याने किंवा सामाजिक कार्यकर्त्याने या कंपनी  व्यवस्थापना विरोधात  आवाज उठवला तर खाकीचा धाक दाखवित ते आंदोलनं  उधळल्या जाते . तर स्थानिक प्रशासनाकडे या बाबत विचारणा केली असता कंपनीची बाजू घेत आंदोलकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जाते.  आंदोलकांनी आंदोलनं केले तर गुन्हे आणि आमच्याच तालुक्यात प्रकल्प उभारीत करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपनी व्यवस्थापणाने सर्व शासकीय नियम पायदळी तुडवित असतानाही त्यांच्यावर कारवाई तर सोडा साधी विचारणाही केल्या जात नाही .हे आम्हा वरोरा तालुका  वासियांचे दुर्दैव आहे . गेल्या तीन चार दिवसापूर्वी परराज्यातील शेकडो कामगार विना परवानगी शहरात दाखल झाले . एरवी एखाद्या गरिबाच्या घरी कार्यक्रम असेल किंवा गल्लीतील एखादी दुकान सुरू असेल याची संपूर्ण अपडेट असणारे आणि नेहमी दक्ष असणारे पथक एवढ्या मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगारांचा  जथ्था शहरात दाखल होतो आणि हे पथक येवढ्या कुंभकर्णी झोपेत असते हे नवलच नाही का ? यातील काही कामगार कोरोना पॉझिटिव निघाल्या नंतरही कंपनी व्यवस्थापनावर कारवाई न व्हावी हा विषय नक्कीच विचार करायला भाग पाडणारा आहे . संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा अशा अधिकाऱ्यांविरोधात आवाज बुलंद करावा लागेल असे मत प्रहार सेवक  आशिष घुमे यांनी मुलाखती दरम्यान व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler