ब्रेकिंग न्यूज़ दूचाकिची समोरासमोर धडक एक ठार दोन जखमी
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधी
मनोज अगळे 9765874115
ब्रह्मपुरी आरमोरी रोड वरील रनमोचन फाटा लगत असलेल्या बसस्थानकाजवळ हायवे मार्गावर खराब झालेल्या रस्त्यावर दोन मोटर सायकची आमने सामने धडक झाल्याने मोठा अपघात घडला.
सविस्तर असे कि यात ब्रह्मपुरी आरमोरी रोड वरील रनमोचन फाटा लगत असलेल्या बसस्थानकाजवळ हायवे मार्गावर रात्रो ८.३० च्या सुमारास दोन दूचाकिची समोरासमोर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी असून तिसर्या व्यक्तीला किरकोळ जखम झाली आहे.मृत व्यक्ती गांगलवाडी येथील असल्याची माहिती असून त्यांचे नाव अर्णव देवगडे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुसरे जखमी व्यक्ती ब्रह्मपुरी येथील जानी वार्ड येतील बंडू उरकुडे व त्याचे सोबती असल्याची माहिती आहे . पूढील तपास ब्रम्हपूरी पोलिस करित आहेत.
