प्राथमिक आरोग्य केंद्र मेडंकी येथे हत्तीरोग रूग्नाना केअर किटचे वाटप
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
आज दि.१७/८/२०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केद्रं मेंडकी च्या वतीने हत्तीरोग रूग्णांना राष्ट्रीय हत्तीरोग नियत्रंण कार्यक्रमा अंर्तगत बाह्यलक्षणे हत्तीरोग असलेल्या रूग्णांना केअर किटचे वाटप करण्यात आले. किटचे वाटप मा. प्रमोद भाऊ चिमूरकर जि.प. सदस्य चंद्रपूर यांचे हस्ते, मा. थानेश्वर पाटिल कायरकर प. स. सदस्य ब्रम्हपूरी यांचे अध्यक्षतेखाली, सौ.मंगलाताई ईरपाते सरपंच ग्रा.प. मेंडकी, सौ. मंगलाताई लोनबले सदस्या रूग्ण कल्याण समिती, मा. डॉ. के. एम. धुर्वा वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केद्रं मेंडकी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य साहाय्यक के. डब्लू. पेदांम, एस एफ डब्लू व्हि. पी. गहाणे, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी एस. आर. मातेरे, श्रेत्र कार्यकर्ता ए.डब्लू. पवार, पि. डि.आडे, एस.आर.काबंडी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारीवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले
यावेळी उपस्थित रुग्णांना डॉ. धुर्वा यांनी हत्तीरोग विषयी व हत्तीपाय झालेल्या रूग्नानां त्या पायाची निगा कशी राखायची या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

