समर्थ कृषि महविद्यालय देऊळगांव राजा येथे विरपत्नी श्रीमती मिनाताई रघुनाथ जायभाये यांच्या हस्ते तसेच समर्थ कृषि महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले .
देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी
चंद्रभान झीने
या प्रसंगी स्वातंत्र्य दिनाचे औचित्त साधुन महाविद्यलयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांनी कोरोनाची सद्यपरीस्थिती पाहता सर्वांनी आपल्या आरोग्यास प्राथमिकता देउन आपले कर्तव्य पार पाडावे तसेच कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नविन संशोधन करून शेतक यांच्या उपयोगी येणारे व कमी खर्चात सहज उपलब्ध होतील असे तंत्रज्ञान विकसीत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली . प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी प्रास्ताविकेत महाविद्यालयाचा उत्कर्ष व कृषिदुतांमार्फत परीसरातील शेतक - यांना होत असलेला कृषिज्ञानाचा प्रचार व प्रसार तसेच सद्यपरीस्थितीत कोरोना विषाणुचा प्रभाव पाहता व्ययक्तिक स्वास्थाला प्राध्यान्य देउन युवकांनी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार शिक्षणासोबतच करुन शेतक यांना समजेल अशा माध्यमातुन जास्तीत जास्त कृषी ज्ञानाचा प्रसार करावा जेणेकरुन अल्पभुधारक शेतकरीदेखील सधन शेतकरी म्हणुन ओळखल्या जाईल . सोबतच या कृषिज्ञानामुळे शेतक - यांना आर्थिक फायदा मिळेल . तसेच मिळालेल्या स्वातंत्राचा सदउपयोग करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी देशाला सशक्त करावे असे आवाहन केले . सोबतच समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा . प्रफुल्ल ताठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा . मोहजितसिंह राजपुत यांनी केले . याप्रसंगी रामेश्वर जायभाये , पत्रकार गजानन घुगे , प्रा . गबाजी कुटे , दत्तात्रय घुले , समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सचिन घुगे तसेच समर्थ कृषि महाविद्यालय , समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते .

