वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या! खासदार व आमदार यांना वैद्यकीय अधिकारी वरोरा यांनी दिले निवेदन निवेदनातून आरोग्य मंत्र्याकडे मागणी
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- बीएएमएस अहर्ताधारक वैद्यकीय अधिकारी गट 'ब' च्या सर्वगाचे अधिकारी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून दोन्नतीच्या हक्कापासून वंचित आहेत. म्हणून त्यांना तातडीने पदोन्नती द्यावी अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने आरोग्य मंत्री याना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मागील 15 ते 20 वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी हे अविरत पणे अतिशय दुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळात तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरीव योगदान देत आपली उत्कृस्ट सेवा बजावली. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका जिल्हाभऱ्यात मोठया प्रमाणावर पोहचला नाही. परंतु एवढ्या वर्षापर्यंत उत्तम सेवा संधी दिल्या गेल्या नाहीत. यात बहुतेक वैद्यकीय अधिकारी गट 'ब' यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी गट 'अ' सर्वगाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय आरोग्य सेवेचा भार वैद्यकीय अधिकारी गट 'ब'यांच्या खांद्यावर आहे असे असून सुद्धा त्यांना समान काम समान वेतन व सण 2000 च्या शासन अधिसूचिनुसार त्यांची पदोन्नतीही शक्य आहे
मनुन त्याच्यावरील होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी च्या मार्फत आरोग्य मंत्र्या कडे निवेदना द्वारे करण्यात आली निवेदन देताना डॉ.मुंजनकर, डॉ.हेमंत फुलझेले, डॉ.स्वप्नील टेम्भे, डॉ.राहुल वासनिक, डॉ.भट्टाचार्य हे उपस्तीत होते.

