शिवनपायली येथे वृक्षारोपण करून दिला गणपती बाप्पाला निरोप
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो,7038115037
चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न
प्रतिनीधी नेरी।चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या शिवनपायली येथे शासनाच्या एक गाव एक गणपती या संकल्पनेतून एकच गणेशाची स्थापना केली ही संकल्पना राबविण्यासाठी चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांनी या संकल्पनेची माहिती दिली आणि शांतता सुव्यवस्था कायदा कसा अबाधित राहील हे समजावून सांगितले त्यामुळे संपुर्ण गाववाशियानी एकच गणपती ची स्थापना करीत समाजासमोर नवा आदर्श निर्माण करीत वृक्षारोपण करीत गणपती बाप्पाला निरोप दिला चिमूर स्टेशन चे पोलीस निरीक्षक गभने साहेब यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून नवा पायंडा गणेशोत्सवाला निर्माण करून दिला
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गर्दी होणार नाही तसेच शांतता सुव्यवस्था व कायदा अबाधित राहील यासाठी नियमावली तयार केली होती आणि एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवित अनेक गावांत एकच गणपती ची स्थापना करण्याचे आदेश दिले ही संकल्पना चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांनी प्रत्येक गावात समजावून सांगितली तेव्हा शिवनपायली येथील नागरिकांनी ही संकल्पना स्वीकारून अनेक गणपतीची स्थापना न करता एकच गणपती ची स्थापना केली आणि या उत्सवात नियमाचे पालन करून भाग घेतला व गणेशोत्सव विसर्जनाला 'डोल तश्याचे गजर न करता वृक्षारोपण करून वृक्ष वल्ली सगेसोयरे याची परिचिती दिली या वृक्षारोपण कार्यक्रमाला चिमूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी हनुमान मंडळाचे अध्यक्ष आनंदराव आकोजी बोरकर व संपूर्ण शिवनपायली वाशीय गावकरी नागरीक उपस्थित होते
