प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे लसीकरण विभागात रांगाच रांगा ऊन वारा पावसात जनतेच्या जीवाशी खेळखंडोबा

प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे  लसीकरण विभागात रांगाच रांगा ऊन वारा पावसात जनतेच्या जीवाशी खेळखंडोबा

त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आफरेटरच ऊपलब्ध नाही

प्रशासन झोपेचे सोंग घेऊन जोमात नागरीक कोमात. 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे



चिमुर:- अख्या जगामध्ये कोरोना आजाराचे थैमान घातल आहे  या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक  प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबवीत आहे. मात्र चिमुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी हे गेल्या काही वर्षांपासून अनेक समस्यांनी ग्रासलेल आहे त्या आरोग्य केंद्रात  दररोज लसीकरण विभागांमध्ये लसीकरण घेण्यासाठी गावातील नागरीक वेळेवर येऊन आपापल्या रांगा तयार करतात  परंतु लसीकरण विभागात तब्बल दोन ते तीन तास उशिरा पर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नाही. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी आरोग्य विभागात डाटा ऑपरेटर उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायत नेरी कडून डाटा ऑपरेटर यायचा आहे डाटा ऑपरेटर आल्यानंतर लसीकरण सुरू होईल अशी माहिती दिली. लसीकरण उशिरा सुरू झाल्यामुळे जनतेला लसीकरण घेण्यासाठी तब्बल दोन तास रांगेत उभे राहून वाट पाहावी लागली . लसीकरण विभागात लसीकरण घेण्यासाठी येणाऱ्या जनतेसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे विभाग जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. जसे या विभागात जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, येणाऱ्या जनतेसाठी सॅनीटायझर उपलब्ध नसून सोशल डिस्टंसिंग चा तर धज्जांच ऊडाला आहे,ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी या विभागाने व्यवस्थाच केलेली नाही. त्यामुळे कित्येक नागरीकांना रांगेत उभे राहु राहु  चक्कर येऊन पडने असे प्रकार आजपर्यंत कित्येक घडले आहेत. हे विभाग पूर्णतः जनतेच्या जीवाशी खेळत आहे.  यावर संबंधित वरिष्ठअधिकारी आणि पदाधिकारी यांनी लक्ष देऊन हा जनतेच्या जीवाशी खेळला जाणारा खेळखंडोबा त्वरित थांबवावा अशी सर्व जनतेची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler