कोरोना महामारीत थांबलेली मिन्झरी बस सेवा पुन्हा सुरू झाली.

कोरोना महामारीत थांबलेली मिन्झरी बस सेवा पुन्हा सुरू झाली.

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सतत पाठपुरावा. 


चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

सचिन वाघे मो.9673757006



चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले मिन्झरी गाव जंगल मध्ये असून मुरपार डब्लू सी एल खदान जवळ असून येथील बस सेवा कोरोना काळात बंद झालेली होती. परंतु कोरोना स्थिती मंदावली असून बस सेवा बंद असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा सतत पाठपुरावा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी करून चिमूर - खडसंगी- मिन्झरी बस सुरू करवून घेतली .बस चालक वाहक यांचा शाल देऊन सरपंच यांनी सत्कार केला. 

           मुरपार ,मिन्झरी या गावातील   नागरिकांना तर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना चिमूर ,खडसंगी   येथे जाणे येणे साठी गैरसोय होत होती .जंगल व्याप्त परिसर असल्याने सुद्धा दुचाकी किंवा पायदळ येणाऱ्यांना सुद्धा जंगली प्राण्यांचा धोका होता. तेव्हा ही बाब नागरिक व विद्यार्थी यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडे सांगण्यात आली असता सतत पाठपुरावा करून  मिन्झरी पर्यत बस सेवा सुरू करवून दिली. 

          चिमूर बस आगार मधून मिन्झरी येथे बस आली असता सरपंच जगदीश ननावरे यांनी बस वाहक यांचे शाल देऊन सत्कार आले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते तथा बंदर ग्राम पंचायत सदस्य मनी रॉय, उपसरपंच भरत अथरगडे, ग्राम पंचायत सदस्य कविता अथरगडे, वैशाली दोडके, इंदिरा दोडके, दिगाबर राजूरकर मनोहर अथरगडे, संदीप आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler