चिमूर आठवळी बाजाराचा लिलावच झाला नसून गुजरी ठेकेदार वसुली करतो तरी कसा ?
गुजरी बाजाराचा लिलाव तर आठवळी बाजाराची अवैध रित्या वसुली सुरू. ठेकेदाराचे व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यां सोबत आपसी लेवान देवाण झाल्याची जनसामान्यांत दबक्या आवाजात चर्चा.
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रवीण वाघे
चिमूर कोरोना कोविड मुळे लॉकडाउन सुरु झाले आठवडी बाजार बंद झाले मग आठवळी बाजाराची परमिशन दिलीच नसून मग हा आठवळी बाजार भरुन त्याची वसुली वैध की अवैध? नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या गुजरीचा लिलाव झाला मग आठवळी बाजाराचा लिलाव झाला नसताना सुद्धा एक गुजरी ठेकेदारच चिमूर आठवळी बाजाराची एका नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून चिमूर शहरात बाजारात येणाऱ्या भाजी व इतर दुकानदारा कडून चिट्टी च्या नावाखाली अवैध वसुली करीत असून नगर परिषदेचा लाखों रुपयाच्या महसूल बुडवत असून तो लाखो रुपयांची उलाढाल वसुली करणाऱ्या ठेकेदाराच्या व न प च्या एका कर्मचाऱ्या खिशात तर जात नसेल ना अशी चर्चा सरास पणे सुरू आहे
आठवडी बाजाराची आता पर्यन्त होत असलेली बाजाराची वसूली ही अवैध रित्या होत असून ही सक्ती ची वसुली लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी. आठवळी बाजारात येणारे फळ , विक्रेते, लहान मोठे व्यापारी व तालुक्यातील भाजीपाला विकणारे शेतकरी करत आहे
