ब्रेकिंग न्यूज :- एस आर के,कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वरोरा - चिमुर वाहतुक ठप्प
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
वरोरा : वरोरा - चिमुर सिमेंट रस्त्याचे काम मागिल ४ वर्षापासून अतिशय कासव गतीने काम चालू आहे. ठिक ठिकाणी पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रोड संपूर्ण चिखलमय होऊन वारंवार वाहतूक ठप्प होते. या झोपेचे सोंग घेतलेल्या एस आर के कंपनीला जागे करन्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून वारंवार आंदोलन सुद्धा केले मात्र त्या कंपनीला काही वेळेपुरता च जाग येतो नंतर जशीची तसीच परीस्थिती निर्माण होती. बेशरमाच्या झाडात आनी एस आर के कंपनीमध्ये काहीच फरक नाही अस दिसुन येतो.
काल रात्री अचानक झालेल्या पावसामुळे शेगाव जवळील एस. आर. के. कंपनी जवळील पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेल्या पर्यायी रस्त्याचा काही भाग वाहुन गेला. त्यामुळे पर्यायी रस्त्यावरून पाणी असल्याने वाहतूक पुर्ण पणे बंद पडली आहे.
एस. आर. के. कंपनी च्या भोंगळ कारभारामुळे पुलाचे काम पूर्ण होऊन पण पुल वाहतूकीसाठी सुरू न केल्याने आणि पर्यायी रस्ता वर टाकलेला भरणा न उचल्यामुळे शेतकर्यांचे उभ्या पिकात नाल्याचे पाणी घुसले आहे. शेवटी हतबल झालेल्या शेतक-याला स्वत: हातात पावडे घेऊन पानी काढावे लागत आहे. यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. चिमुर वरोरा मार्गावर दररोज काही ना काही अपघात होतात. याला सर्वश्री जबाबदार हि एस आर के कंपनी आहे पुढे या कंपनीचे करायचे तरी काय असा प्रश्न नागरीकांच्या मनात पडला आहे.

