माॅ जिजाऊ वधू वर सुचक केद्रांच्या माध्यमातून लाॅकडाऊन काळामध्ये साखरखेर्ङा येथील तरूण युवकाची विवाह सोहळ्यास मोलाची कामगिरी

 माॅ जिजाऊ वधू वर सुचक केद्रांच्या माध्यमातून लाॅकडाऊन काळामध्ये साखरखेर्ङा येथील तरूण युवकाची विवाह सोहळ्यास  मोलाची कामगिरी

------------------------------------

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

  तालुक्यातील साखरखेर्ङा येथील तरूण युवक तथा माॅ जिजाऊ वधू वर सुचक मंडळ जातीय व आंतरजातीय विवाह केंद्राचे बुलडाणा संस्थापक अध्यक्ष वैभव भाऊराव पवार यांच्या माध्यमातून जळगाव जिल्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर दि.8-5-2021- रोजी मागील मे महीण्यात या गावी  वधू भावना लालचंद कदम ही एरंडोल येथील असुन तिचा विवाह वर सोनु विलास पाटील या दोन्ही दाम्पंत्याचे लग्न लावण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले गेले आहे.या संस्थेने2017 वर्षापासून  वधू वरांचे जातीय व आंतरजातीय विवाह जुळवण्याचे कार्य हाती घेतले आहे व आतापर्यंत लाॅकडाऊन काळात 147 विवाह या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे.महाराष्ट्र असेल,गुजरात असेल,इंदोर असेल,भोपाळ असेल,कर्नाटक असेल तसेच दिल्ली असेल आणि संपूर्ण भारतभर तरूणांसाठी विवाह घडवण्याचे काम पूर्णत्वास नेले आहे.लाॅकडाऊन मध्ये सुद्या या संस्थेने तरूणांचे लग्न लावून त्यांच्या जिवनात पदार्पण करण्याचं चांगल कार्य ही संस्था संपूर्ण भारतभर राबवित आहे व या सस्थेच्या माध्यमातून  तळागातील गोरगरीबांना तसेच अनाथांना मास आणि धान्य तसेच आर्थिक मदतसुद्धा या संस्थेंच्या माध्यमातून केली जाते वैभव पवार सरांचे कार्य खरचं कौतुकास्पद आहे. संस्थेमुळे तरूणांना जिवन जगण्याचे बळ मिळाले आहे आणि या संस्थेकडून एक नविन आदर्श घेण्यासारखा आहे असे मत वधू वरांनी तसेच तरूणांनी व्यक्त केले आहे. तसेच या शुभारंभ प्रसंगी उपस्थित वधू वर  माॅ जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैभव भाऊराव पवार,ऊपाध्यक्ष शारदा ताई गजानन अवघडराव अनुवा,सचिव राहूल भाऊराव पवार,कोषाध्यक्ष पुजा वैभव पवार,सहसचिव संगिता राजु मुळे,सदस्यरूखमिना भाऊराव पवार यांच्या हस्ते शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच आशिर्वादसुद्धा देण्यात आले.वधू वरांनी माॅ जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैभव भाऊराव पवार तसेच संस्थेतील प्रत्येक पदाधिकाय्राचे त्यांच्या या अप्रतिम कार्याचे मनस्वी स्वागत केले आहे.या विवाह प्रसंगी तरूणांना आव्हाहन करण्यात आले की,ज्या तरूणांचे विवाह झाले नसतील तर आमच्या संस्थेला कळवावेआणि आम्ही दोन्हीवधू वरांचे विवाह  घडवून जुळवून देऊआणि त्यांच्या जिवनात आनंद देण्याचे काम आमची संस्था करीत आहे असे आव्हान संस्थेच्याअध्यक्षांनी आपले मांडले आहे. तसेच माॅ जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेचे  पदाधिकारी यांचे संपूर्ण भारतभर तरूणांनी आणि बुलडाणा जिल्यातील तरूणांनी सुद्धा यांचे आभार व्यक्त केले आहे तसेच  संस्थेचे अध्यक्ष वैभव भाऊराव पवार आणी त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी यांचे नावलौकीक संपूर्ण भारतभर होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler