वंचित गावांना पोखरा योजनेचा लाभ मिळून द्यावा राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष जाधव यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे
देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकय्रांनी महाराष्ट्र शासनाच्या पोखरा योजने पासून तालुक्यातील ४४ गावे वंचित राहिली असून या गावांनाही सदर योजनेचा लाभ देऊन शेतकऱ्यांना हक्काचा न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी दि.11रोजी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील ४८ गावांपैकी बायगाव, डोड्रा,मंडपगाव,पिंपरी आंधळे या चार गावातील शेतकऱ्यांना पोखरा योजनेचा लाभ मिळत आहे उर्वरित ४४ गावे शासनाच्या सदर योजनेपासून वंचित राहिल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे सदर विषयाला अनुसरून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन चर्चा केली व शासनाच्या पोखरा योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्वच गावांना लाभ देण्या साठी उर्वरित ४४ गावांचा सदर योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्यशासनाच्या पोखरा योजनेत तालुक्यातील बोटावर मोजण्या एवढी गावे समाविष्ट असून उर्वरित बहुतांश गावे वंचित राहिल्याने तेथील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे सदर प्रकरणा बद्दल पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून जास्तीत जास्त गावांचा सदर योजनेत समावेश करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री जाधव यांच्यासमवेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
