प्रहार चालक मालक संघटनेचा वर्षापन दिन साजरा,
कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावेना,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
मागील वर्षी गडचिरोली शहरात मोट्या थाटा माठात मा, संस्थापक अध्यक्ष श्री बचु भाऊ कडु आमदार तथा राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात प्रहार चालक मालक संघटना ची सुरुवात करण्यात आली,
संघटनेने जणू एका वर्षातच खुप मोठी क्रांती करत,अनेक कार्यक्रम घेऊन जसे रक्तदान शिबिर,अपंग बांधवांची मदत,रुग्णसेवा, रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांची दुरुस्ती इत्यादी महत्वाच्या सेवा या संघटनेने करून दाखवलं होतं,
त्यातल्या त्यात वनभोजन हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा राबवला,
यातूनच प्रहार चालक मालक संघटना जनतेला आपली वाटू लागली,त्यात चालक मालक च्या 100 ते 150 नोंदणी सुद्धा झाल्यात,
ह्या विशेष ,या कार्याला 1 वर्ष पूर्ण होऊन 2 रे वर्ष सुरू झालेत त्या निमित्याने 15 आगष्ट रोजी धानोरा रोड गडचिरोली येथे फटाके फोडून,कार्यकर्त्यांनी जणू उत्सवच साजरा केला व मिठाई सुद्धा वाटली,व नाश्त्याची सोय सुद्धा यावेडी करण्यात आली,
याप्रसंगी,जिल्हा संघटक श्री संदीप कांबळे, जिल्हा अध्यक्ष श्री सुनील भाऊ तामशेतवर,जिल्हा सचिव श्री इम्रान पठाण,श्री स्वप्नील दादा मने,शहर अध्यक्ष श्री जमीर भाई शेख,श्री मुरली दादा गोहणे,मिलिंद दादा खेवले,ठाकूर बन्सोड काका,गुरुदेव नैताम,अशपक पठाण,मनोज गवारे,कुमोद रोहनकर,साईनाथ चलाख,आकाश धांदरे, राजिक भाई,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,,

