उपजिल्हा रुग्णालयात दर्जा देण्यात यावा /डॉ तौसिफ शेख यांची मागणी
अमोल भोलनकर मो.8262087866,
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
खामगाव तालुक्यातील लाखनवाडा ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा येथे उपजिल्हा रुग्णालय याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जिल्हा आरोग्य समन्वय समितीचे सदस्य डॉ तौशिफ यांनी एका निवेदनाद्वारे केली. लाखनवाडा येथे ग्रामीण रुग्णालय असून चिखली, मेहकर ,चिखली, खामगाव ,अकोला ,या शहरापासून ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिशय दुर्बल भागामध्ये लाखनवाडा या गावांमध्ये ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयांमध् या परिसराला लागून असलेल्या सर्व ग्रामीण भागातील रूग्ण रुग्णसेवा साठी येतात मात्र या रुग्णालयांमध्ये भिशी रुग्णावर रुग्ण उपचारासाठी सुविधा नसल्यामुळे रुग्णांना अकोला किंवा खामगाव येथे पाठवले जाते रुग्णांना परवडणारा खर्च न परवडण्यासारखा असल्यामुळे लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा उप रुग्णालय चा दर्जा देण्यात यावा रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी डॉ तोसिफ यांनी केली.
