राजेगांव येथे अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी .
समाधान बंगाळे।तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे राजेगांव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व वरली मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून सदर अवैध धंदे बंद करावे अशी मागणी महिला वर्गातून निघत आहे अनेक महिलांनी सरपंच उमेशराव शेजुळ यांच्याकडे तक्रार दाखल करतातच सरपंच महोदय यांनी सदर विषय ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये मांडून सदर विषयावर चर्चा करून अवैध दारू विक्री व वरली मटका हे धंदे बंद करण्यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करून साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राणे साहेब यांना देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षे पासून गावात अवैध दारू विक्री व वरली मटका सुरू असल्यामुळे अनेकांचे संसार या दारू पायी उध्वस्त झाले आहे. असून गावामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात भांडणतंटे वाढले असून या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी राजेगांव येथील अवैध दारू विक्री व वरली मटका बंद करण्यात यावा अशी मागणी राजेगांव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली. यावेळी राजेगांव येथील सरपंच उमेश शेजुळ पोलीस पाटील शरदराव शेजुळ
उपसरपंच संजयराव भालेराव ग्रामपंचायत सदस्य उमाकांत गवई संजय सरकटे श्रीकिसन शेजुळ देविदास राऊत सुर्यकांत पवार किशोर भालेराव यावेळी उपस्थित होते.
