ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरु करा- ग्रा प सदस्य सामाजिक कार्यकर्ता तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार 9623494935
सावली :- सध्या लाॅकडाउन असल्यामुळे सावली तालुक्यातील बस सेवा पुर्णता बंद आहे त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला होत आहे. शाळा सुरु झाले शालेय विद्यार्थी, शेतकरी,शेतमजुर व सावली तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामा करीता,शेति निविष्ठा खरेदी,आरोग्या करिता दवाखाना तसेच शेतमाल व धान्य विक्री,विविध कामा करीता जावे लागते.तसेच शाळेमध्ये विध्यार्थाना जाणे-येणे करावे लागते, बस सेवा बंद असल्यामुळे सदर बाबीचा फटका शेतकरी शेतमजुरास सामान्य नागरिकास व शालेय विध्यार्थाना बसलेला आहे, कारण सामान्य माणसाजवळ स्वतःचे वाहन नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दोन चाकी वाहनानि जाने-येणे करू शकत नाही.
करीता एस.टी. महामंडळा मार्फत मुल सावली ते हरांबा उपरी मार्ग व कवठी चामोर्शी गडचिरोली केरोडा चांदली
याप्रमाणे बस सेवा तातडीने सुरू करावि अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ता ग्रा प सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी केलेली आहे.
