कृषीदुतांचे शेतकऱ्यांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन जनावरांना उद्भणार्या आजाराच्या प्रतिबंधबाबत दिली माहिती
सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
समाधान बंगाळे
पावसाळा सुरू झाल्यानंतर जनवरामध्ये विविध प्रकारचे आजार उदभवतात या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनावरांना लसीकरण करणे गरजेचे असते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जनावरांना लसीकरण करावे लसीकरणाची गरज व लासिकरणापासून होणारे फायदे याबाबत समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत सिंदखेडराजा येथील शेतकऱ्यांना माहिती दिली.यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उधार सर (LDO), डॉ व्हि जी इंडोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी शांताराम म्हस्के यांना मार्गदर्शन केले कृषीदुत सिंदखेडराजा गटामध्ये अमोल गव्हाड ,भागवत जाधव किशोर डोंगरे, अनिल मांन्टे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे रावे समन्वयक प्रा. मोहजीतसिंग राजपूत सर, प्रा. धांडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे जनावरांच्या घटसर्प फऱ्या हे रोग प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला होतात . या रोगापासून जनावरांची रक्षण करण्यासाठी आपल्या जनावरांना वेळीच लसीकरण करणे आवश्यक असते लसीकरण दरवर्षी पावसाळ्याच्या आधी जुन ते ऑगस्ट महिन्यात करण्यात येते असा प्रतिबंधात्मक उपाय जनावरांना आजार उद्रवु नये म्हणून रोग प्रतिबंधक लस जनावरास टोचणे फायदेशीर ठरते सर्व संकरित व देशी जनावरांना किमान वर्षातून दोन वेळा ऑक्टोबर- नोव्हेंबर आणि मार्च ते एप्रिल या महिन्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लस देऊन घ्यावी लसीकरणपूर्वी घ्यायची काळजी :- जनावरांना लसिकरणापूर्वी आठवडाभर आधी जंतुनाशक औषध द्यावे तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड, गोमाशा, लिखा,पिसा,या कीटकांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे . जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी सकस आहार तसेच व शार व जीवनसत्व द्यावेत.
