पचांयत समिति सदस्य श्री थानेश्वर पाटिल कायरकर यांच्या मागणीला यश

 पचांयत समिति सदस्य श्री थानेश्वर पाटिल कायरकर यांच्या मागणीला  यश


 ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि

 मनोज अगळे

 9765874115

    

   ब्रम्हपूरी तालूक्यातील सर्वात मोठे व राजकीय संवेदनशील असलेले मेंडकी गांव आहे मेंडकी व परिसरातील २७ गांवातील नागरीकांना चंद्रपूर या जिल्हाच्या  ठिकानी  ये-जा करने करिता खूपच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाच्या ठिकाणी रेल्वे ने सोईचे होते परंतू कोविड-19 ची परीस्थिती निर्माण झाल्यामूळे रेल्वेसेवा बंद असल्याने नागरीकांना चंद्रपूर जिल्हाच्या ठिकाणी कार्यालयीन कामाकरीता ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना  जिल्हाच्या ठिकाणी   ये-जा करणे सोयिचे  व्हावे म्हणून ब्रह्मपुरी पंचायत समिति सदस्य श्री थानेश्वर पाटिल कायरकर यांनी वारंवार पाठपूरावा करून ब्रम्हपूरी-मेंडकि-एकारा सिंदेवाही-चंद्रपूर हि बसफेरी सूरू करून नियमित सूरू ठेवावी ही मागणी रेटून धरली. आज पासून ही बसफेरी ब्रम्हपूरी वरूण सकाळी ८.३० वा व चंद्रपूर येथून २ वा. सूरू झाली.मेंडकी वरुन चंद्रपूर बसभाडे फक्त १२५/- रुपये आहे.त्यामुळे मेंडकी व परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्हाचे ठिकाणी ये-जा करणे सोईचे होत असल्याने. पचांयत समिति सदस्य थानेश्वर पाटिल कायरकर यांचे सर्वत्र आभार व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler